Jitendra Awhad : टी राजाला महाराष्ट्रात येऊनच का देतात? जितेंद्र आव्हाड यांच्या सवाल
Jitendra Awhad on t Raja : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची टी. राजा यांच्याबाबत संतप्त प्रतिक्रिया
ठाणे :- तेलंगणाचे आमदार टी राजा (T Raja) हे भिवंडीच्या पडघा येथे आज सायंकाळी हिंदुत्व प्रबोधन करण्याकरिता येणार आहे. त्यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आले आहे. टी. राजाला महाराष्ट्रात येऊनच का देतात? असा सवाल यावे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. टी राजा हे भाजपाच्या आक्रमक नेत्यांपैकी एक असून ते नेहमी आपल्या भाषणातून मुसलमान समाजाला इशारा देत असतात. तसेच, ओवेसी बंधू वर सातत्याने टीका करून आरोप प्रत्यारोप करत असतात. 22 जानेवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मीरा रोडच्या नया नगर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला होता या घडामोडीनंतर आमदार गीता जैन आमदार नितेश राणे आणि टी.राजा यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य रॅली काढण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी थेट आरोप करत टी राजा हे राज्यात येऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले?
ज्याने मागच्या वर्षभर आपल्या भाषणांमधून सबंध महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून टाकले होते. तो टी. राजा लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्यासाठी भिवंडी शहरानजीकच्या पडघा येथे येतोय. महाराष्ट्र सरकारला अनेकवेळा सांगितले गेलेय की, त्याची भाषणे द्वेषाने भरलेली, अतिशय घाणेरडी असतात. त्याच्यामुळे धर्मद्वेष पसरण्याची शक्यता असते. शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचा विचार केला जातोय का? महाराष्ट्र अशांत करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचे या सरकारचे प्लॅनिंग आहे का? जर तसे नसेल तर टी. राजाला महाराष्ट्रात येऊनच का देता?
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, ज्याच्या भाषणाने द्वेष पसरतो; अशा माणसाला तत्काळ अटक करा, असे सांगितलेले असतानाही ठिकठिकाणी इतर धर्मियांवर टीका करून, शाब्दिक हल्ले चढवून वातावरण बिघडवण्याचे काम टी. राजाने केले आहे. महाराष्ट्र सरकारने कुठलीच कारवाई केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र सरकार केराची टोपली दाखवत आहे का? याची सगळी उत्तरं महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेला हवी आहेत.