Jitendra Awhad : काका का?’ हे आता यांच्या चांगलं लक्षात आलं असेल
•सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला खोचक सवाल
मुंबई :- सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवार यांचे नाव व फोटो वापरण्यास मनाई घातल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार यांना खोचक टोला हाणला आहे. या वयातही तुमच्याकडे स्वतःची कोणती ओळख नाही. त्यामुळे काका का? हे आता तुमच्या चांगले लक्षात आले असेल, असे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. Jitendra Awhad
निवडणूक आयोगाने NCP च्या अजित पवार गटाला अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. पण त्यानंतरही या पक्षाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव व छायाचित्राचा का वापर करत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एका प्रकरणात सुनावणी करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे. कोर्टाने या प्रकरणी अजित पवार गटाला शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नसल्याचे हमीपत्र दाखल करण्याचेही निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना टोला हाणला आहे. Jitendra Awhad
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायदान करण्याच्या आसनावर बसलेले असताना आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल जी टीप्पणी केली आहे ती छाती फुगवणारी होती. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाने न्यायासनवर बसून अशी टीप्पणी कोणाबद्दल केली असेल, असे मला तरी आठवत नाही. सर्वोच्च न्यायालयाला जे कळले ते ज्या बालकांना हाताला धरून शरद पवार साहेबांनी चालविले; त्यांना समजले नाही, हे दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीने माझे मात्र उर भरून आले. Jitendra Awhad
“आम्हाला लिहून द्या की तुम्ही शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही. शरद पवार हे राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व आहे, त्यांच्या नावाने इतकी वर्ष तुम्ही निवडणुका जिंकल्या आहे. परंतु आता तुम्ही तुमची वेगळी चूल मांडली आहे, तर शरद पवारांचं गुडविल वापरू नका. आत्मविश्वास असेल तर स्वत:ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा.” – इति सर्वोच्च न्यायालय Jitendra Awhad
राजकारण म्हणजे फक्त बेरजेचे गणित नसते. लोकांमध्ये जाऊन, जमिनीवर काम करून स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते. राजकीय आणि सामाजिक जीवनात नितीमत्ता जपावी लागते. तुमच्या कृतीने तुम्ही स्वत: स्वत:च्या अंगावर शिंतोडे उडवून घेतले आहेत. ‘या वयात’ही तुमच्याकडे स्वत:ची ओळख नाही. आमच्या बापाने निर्माण केलेला आणि वाढवलेल्या पक्षावर तुम्ही हक्क सांगताय. आजपर्यंत लोकं तुम्हाला तुमचं अस्तित्त्व विचारत होती, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. Jitendra Awhad
‘काका का?’ हे आता यांच्या चांगलं लक्षात आलं असेल.