मुंबईठाणे
Trending

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी

Jitendra Awhad Threat Message : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मेसेजमध्ये शिवीगाळ केल्याचा स्क्रीन शॉट केला एक्सवर‌ पोस्ट

ठाणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. Jitendra Awhad Threat Message आव्हाड यांनी स्वत: ही माहिती एक्सवर दिली आहे. तसेच धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक पोस्ट करुन पोलिसांनी दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हाॅट्सॲप या समाजमाध्यमावर एक संदेश प्राप्त झाला होता. या संदेशामध्ये त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच आव्हाड यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे. हे प्रकरण त्यांनी ठाणे पोलीस आणि डीजीपी महाराष्ट्र यांना एक्स या समाजमाध्यमावर ट्विट केले आहे. तसेच त्यांनी धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या पोस्टमध्ये स्क्रीनशाॅट द्वारे पाठविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0