आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगकडून धमकी… पैशाची केली मागणी
मुंबई :- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलाय. बिष्णोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे.
बिष्णोई गँगने अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना गुजरातमधून अटक केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बिष्णोई गँगने आमदार जितेद्र आव्हान यांना धमकीचा फोन केलाय. यामुळे बिष्णोई गँगच्या रडारवर महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत का अशी भीती व्यक्त केली जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत तर सलमानसारखं होईल असं म्हटल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार आहे. यानिमित्ताने बिष्णोई गँग महाराष्ट्रात सक्रिय होतेय का? असंही बोललं जात आहे.
आमदार जितेद्र आव्हान यांना धमकीचा फोन
रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने जितेंद्र आव्हान यांना फोन केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिष्णोई गँगचा असल्याची माहिती आहे. पैसे दिले नाही तर तयार राहा असा इशारा धमकी देणाऱ्याने दिल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. धमकीचा फोन ऑस्ट्रेलियावरुन आल्याची माहिती आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…