Jitendra Awhad: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रकाश आंबेडकर यांना पत्र
Jitendra Awhad Sent Lettter To Prakash Ambedkar : जितेंद्र आव्हाड यांचा प्रकाश आंबेडकर यांना समविचाराच्या पक्षांनी एकत्र येण्याची मागणी
मुंबई :- लोकसभेच्या निवडणुका Loksabha Election कधीही जाहीर होऊ शकतात महाविकास आघाडी यांच्या सध्या जागा वाटपा संदर्भात सातत्याने बैठकी होत आहे. परंतु महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनधरणी चालू आहे. प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, समविचाराच्या पक्षाने एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याकरिता एकत्र यावे.
जितेंद्र आव्हाड आपल्या पत्रात काय म्हणाले?
मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
आपणांस सविनय जयभीम !
मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनमोणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून म्हणजेच आपणांकडे पाहिले जात आहे.
आपणांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे.
जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही.
त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला
जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया !
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.!