Jitendra Awhad MCA Election 2025 : वानखेडे स्टेडियमवर पार पडली त्रैवार्षिक निवडणूक; आव्हाडांकडून क्रिकेटसाठी ‘सर्वोत्तम कामगिरी’चा शब्द
मुंबई :- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कार्यकारी समितीच्या त्रैवार्षिक (2025-28) निवडणुकीत शरद पवार आणि भाजप नेते आशीष शेलार गटाच्या पॅनेलने मोठी बाजी मारली आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या निवडणुकीत पॅनेलने 16 पैकी 12 जागांवर विजय मिळवत एमसीएच्या कारभारावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
निवडणुकीतील महत्त्वाचे निकाल
एमसीएच्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली. 12 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकीत प्रमुख पदांवरील लढतींचे निकाल खालीलप्रमाणे लागले:
उपाध्यक्षपद: डॉ. जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट) यांनी नविन शेट्टी यांचा पराभव करत विजय मिळवला.
सचिवपद: डॉ. उन्मेष खानविलकर विजयी झाले.
सहसचिवपद: निलेश भोसले यांची निवड झाली.
खजिनदारपद: अरमान मलिक यांनी विजय मिळवला.
अपेक्स कौन्सिल सदस्य: विघ्नेश कदम, नदीम मेनन, मिलिंद नार्वेकर, विकास रेपाळे, भूषण पाटील, प्रमोद यादव, सुरज सामंत, संदीप विचारे, नील सावंत हे नऊ सदस्य विजयी झाले.
आव्हाडांनी व्यक्त केले आभार आणि दिला शब्द
उपाध्यक्षपदी विजय मिळवल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट करून मतदारांचे आभार मानले. त्यांनी म्हटले, “एमसीए निवडणुकीत पवार-शेलार पॅनलतर्फे मी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा होतो. या निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो.”
यापुढे बोलताना त्यांनी क्रिकेट खेळासाठी वचन दिले: “येणाऱ्या काळात एमसीएच्या माध्यमातून क्रिकेटसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल, हा शब्द यावेळी देतो.”
राजकीय नेत्यांच्या या क्रिकेट संघटनेतील प्रवेशामुळे आता मुंबईतील क्रिकेटच्या विकासाला नवी दिशा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…