मुंबई

Jitendra Awhad On Rupali Chakankar : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर

•महिला आयोग अध्यक्षा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे

मुंबई :- राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहे. त्यांनी एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता माहेरी किती लुडबुड करायची अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चाकणकर यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. Jitendra Awhad On Rupali Chakankar

जितेंद्र आव्हाड यांची टीका

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सुप्रियाताईंबद्दल बोलताना,” माहेरी किती लुडबूड करावी, यालादेखील मर्यादा असतात” , असे म्हणत तमाम स्त्री वर्गाचा अपमान केला आहे. आजच्या काळात स्री-पुरुषांमध्ये भेद राहिलेतच कुठे अन् हे भेद नष्ट व्हावेत, यासाठी तर लढाई सुरू असते. आदरणीय शरद पवारसाहेब यांनी महिलांना दिलेले ५० टक्क्यांचे आरक्षण कशासाठी होते? राजकारणात मिळालेली संधी कशासाठी होती? याचे उत्तर आहे की, महिलाही पुरूषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी, या भावना आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या होत्या आणि आहेत. त्याच शरद पवार साहेब यांच्या मदतीसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रियाताई लढत असतील, संघर्ष करीत असतील तर त्यास ‘लुडबूड’ म्हणून संबोधल्याने रूपालीताई चाकणकर यांच्या बुद्धीचीच किव येते. Jitendra Awhad On Rupali Chakankar

एखाद्या मुलीला ती केवळ मुलगी आहे अन् ती सासरी गेली आहे, म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणे, हा प्रकार राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीबा जोतिराव फुले- सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे. त्यामुळे जर आपले असे विचार असतील तर यापुढे किमान महात्मा जोतिबा आणि सावित्रीमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका. जर हजारो वर्षांपूर्वीचे हे जुनाट विचार तुमचे असतील आणि स्री – पुरूष भेदभाव तुम्ही आजही मानत असाल तर तुमची किवच करावीशी वाटते. केवळ ती मुलगी आहे, म्हणून तिचे अधिकार नाकारणाऱ्या जमान्यातील तुम्ही आहात. पण, आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही, असा विचार न करता, एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे; आणि हो, जेवढं कौतूक आईपुढे ढाल म्हणून उभे राहणाऱ्या राहुल यांचे केले जाते; तेवढेच कौतुक आम्हा सर्वांना सुप्रियाताईंविषयी आहे. Jitendra Awhad On Rupali Chakankar

ज्या मुलीच्या बापाने आपुलकीने ज्या स्वकियांना आणि परकियांना मोठे केले आणि ज्यांना मोठे केले; त्यांच्याकडूनच ‘तिच्या’ पित्याला घाव सोसावे लागत आहेत. अशा वादळात. रणसंग्रामातही सुप्रियाताई समर्थपणे खडकाप्रमाणे उभ्या राहून संघर्ष करीत आहेत. ही जिजाऊंची लेक आहे, ही अबला नारी नाही. सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत. दुर्दैवाने आपण ज्या आयोगाच्या अध्यक्षा आहात. त्या आयोगाच्या प्रमुख असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील, याचा विचारच न केलेला बरा!
असो, यापेक्षा अधिक काही लिहिण्यात काही अर्थ नाही. Jitendra Awhad On Rupali Chakankar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0