क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Dombivli Fraud News : घरकर्जाच्या आमिषाने डोंबिवलीत 7.79 लाखांची फसवणूक!

Dombivli Latest Fraud News : ‘सिबील स्कोर’ उंचावण्याच्या नावाखाली महिलेच्या नावे घेतले दुचाकी आणि मोबाईलचे कर्ज; हप्ते बुडल्यावर भामटे शोरूम बंद करून पसार!

डोंबिवली :- रत्नागिरी येथील एका महिलेला घर बांधण्यासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने डोंबिवलीतील तीन भामट्यांनी तिच्या नावे दुचाकी आणि मोबाईलचे कर्ज घेऊन एकूण सात लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणूक करणारे हे तिघे त्यांचे डोंबिवलीतील शोरूम बंद करून पसार झाले आहेत. Dombivli Latest Fraud News

सुपर्णा अंकुश ढेपे (वय 34) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उसरघर गावी घर बांधण्यासाठी त्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे होते. नोकरीच्या शोधात असताना त्यांची अनिल गुप्ता नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. गुप्ता यांनी त्यांना डोंबिवलीत कर्जाचे काम होईल, तसेच कर्जाचे हप्ते भरावे लागणार नाहीत, असे सांगितले.

‘सिबील’ वाढवण्याच्या नावाखाली फसवणूक

गुप्ता यांनी मार्च महिन्यात सुपर्णा यांना डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील एका शोरूममध्ये नेले. तेथे समीर बोस, सुशांत गोवीकर आणि किसन पोपट या तीन इसमांनी तिची भेट घेतली.

त्यांनी सुपर्णा यांना सांगितले की, घरासाठी कर्ज हवे असेल, तर प्रथम तुमचा ‘सिबील’ (CIBIL) स्कोर उंचावावा लागेल.यासाठी वाहन कर्ज आणि मोबाईलवर कर्ज घ्यावे लागेल, आणि ते सर्व हप्ते ते स्वतः फेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर आवश्यक कागदपत्रे घेऊन या भामट्यांनी सुपर्णा यांच्या नावे चार दुचाकींचे 3 लाख 61 हजार रुपयांचे कर्ज घेतले.

सिबील गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी चार मोबाईल खरेदीसाठी 4 लाख 17 हजार रुपयांचे कर्ज घेतले.अखेरीस, “आता तुमची सिबील गुणवत्ता वाढेल आणि 10 लाखांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे सांगून त्यांनी सुपर्णा यांना घरी पाठवले.

हप्ते बुडाले, तेव्हा फसवणूक लक्षात आली

सुरुवातीला समीर बोसने दुचाकींचे चार हप्ते, तर इतरांनी मोबाईलचे चार हप्ते भरले. मात्र, त्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. बँकेचे अधिकारी थेट रत्नागिरीतील घरी येऊन कर्जाची रक्कम भरण्यासाठी तगादा लावू लागल्याने सुपर्णा यांना धक्का बसला.

आपल्या नावे कर्ज कोणी फेडत नाही हे पाहण्यासाठी सुपर्णा यांनी डोंबिवलीतील त्या शोरूममध्ये धाव घेतली. तेव्हा ते शोरूम बंद करून, त्यांच्या नावे घेतलेल्या दुचाकी आणि मोबाईल विकून तिन्ही भामटे पसार झाल्याचे लक्षात आले.

या तिघांनी विश्वास संपादन करून कर्जाच्या माध्यमातून आपली एकूण 7 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुपर्णा ढेपे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. विष्णुनगर पोलीस आता या तीनही भामट्यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0