Jitendra Awhad On Sarkar : वाढदिवसानिमित्त सरकारने मला अनोखी भेट दिल्याचा आरोप ; आमदार जितेंद्र आव्हाड
मुंबई :- साडेतीन वर्षांपूर्वी एका खटल्याच्या विरोधात सरकारी वकील दिल्याने जितेंद्र आव्हाड चांगलेच नाराज झाले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी Maha Vikas Aghdi विरुद्ध महायुती Mahyuti यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या साडेतीन वर्षांपूर्वी एका खटल्यातील सरकारी वकील सरकारची बाजू मांडणार असल्याचे म्हटले आहे. परंतु हे खास वकील खास कारणाकरिता माझ्या विरोधात खटल्यात सरकारची बाजू मांडणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हणाले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हणाले की,मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ६ तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची बाजू मांडणार आहे, असे सत्र न्यायालयात सांगितले. खास वकिल आणण्याचे ‘खास’ कारण काही समजलेले नाही. पण, यातून सरकारचा हेतू आणि सरकारची सूडाची भावना ही काही लपून रहात नाही. जेवढे खोटे करायचे तेवढे खोटे या सरकारने आणि ठाणे पोलिसांनी केले अन् अजूनही करीत आहेत आणि सांगताना मात्र , “आम्हाला काही माहितच नाही; आमचा काही संबंधच नाही,” असे म्हणत असतात. महत्वाचे म्हणजे, केस लिहिताना आपण काय लिहित आहोत हेच त्यांना माहित नसते, अशी अवस्था ठाणे पोलिसांची झाली आहे. आपली अनभिज्ञता की आपली हतबलता हीच त्यांना कळत नाही.
असो, त्याच्याने फारसा फरक पडत नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज सासूचे तर उद्या सुनेचे दिवस येणारच आहेत. वक्त- वक्त की बात है, वक्त सभी पे आता है. चलो, रूकते है; देखते है , कितना दिन चलेगा. सरकारचे अभिनंदन, मला वाढदिवसाला एवढी चांगली भेट दिल्याबद्दल !! माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे आभार ; मला वाढदिवसानिमित्त एवढी चांगली भेट दिली.
पुरोगामी महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला ईश्वर मला आणखी शक्ती देवो, एवढीच आई भवानी चरणी प्रार्थना !!
लडनेसेकौनडरताहै!
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…