मुंबई

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात तीन गोष्टी सांगितल्या आहेत

Jitendra Awhad Speaks on Badlapur Sexual Assault Case एन्काऊंटर सारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत ; आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर नंतर तीन मुद्दे उपस्थित केले आहे. त्यामध्ये त्यांनी बदलापूर लैंगिक अत्याचारा च्या घटना झाल्या त्यावर भाष्य केले शाळा व संस्थाचालकाची ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून पोलिसांवर या सर्व प्रकरणावर दबाव असल्याचाही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे. तसेच, एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच ३ गोष्टी घडल्या.

  1. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर
  2. पोलिसांवर दबाव
  3. शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न

या सगळ्या नंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपित माहीत होते का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे.

हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू करा..!

विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही आहोत. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे, आणि यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत Political Heroism आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे.

महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0