Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विशाळगड बाबत होत असलेल्या कारवाईबाबत पुरावे
•Jitendra Awhad यांचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाचे पोस्ट, विशाळगड गडाबाबत केले भाष्य
मुंबई :- विशाळगडावरील अतिक्रमणाच्या वादावर आता जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या आदेशाशिवाय प्रशासकीय अधिकारी एवढी उद्धट आणि उद्दाम कारवाई करू शकत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी विशाळ गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्ट करा म्हणाले की,विशाळगडावर सुरू असलेली घरे आणि दुकाने निष्कासित करण्याची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर आहे. राज्यातील वातावरण खराब व्हावे, या उद्देशानेच जिल्हाधिकाऱ्यांपासून पोलीस अधीक्षकांपर्यंतची सर्व प्रशासकीय यंत्रणा सरकारच्या आदेशानुसार हे काम करीत आहे. मा. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेल्या आदेशामध्ये, अंतिम निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करू नका, असे स्पष्ट म्हटलेले आहे. मा. उच्च न्यायालयाचा आदेश असताना ही कारवाई करणे म्हणजे, ‘आम्ही कायद्याला जुमानतच नाही. आम्हाला पाहिजे ते आम्ही करू’, असाच अर्थ प्रतीत होत आहे. अन् एवढी उद्धट आणि उद्दाम कारवाई प्रशासकीय अधिकारी हे सरकारी आदेशाशिवाय करूच शकत नाहीत. याचाच अर्थ असे आहे की, या सरकारला वातावरण खराब करायचे आहे. त्याची सुरूवात विशाळगडावरून करीत आहेत; ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात द्वेष, कटुता, धर्मांधता तेव्हाही चालली नव्हती अन् आताही चालणार नाही.
हा घ्या, मा. उच्च न्यायालयाचा पुरावा… त्यामुळे सरकारने राजकीय हेतू पोटीने कारवाई केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.