Jitendra Awhad Target PM Modi Doing Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत मुस्लिम समाजाबद्दल एक विधान केले,आव्हाड यांचे ट्विट
मुंबई :- देशाला सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा भाषणात आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम Hindu Muslim द्वेष पसरवणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी सभेत मुस्लिम समाजाबद्दल एक विधान केले होते. यावरूनच आव्हाड यांनी ट्विट केले आहे. Jitendra Awhad Latest Tweet
ट्विटमध्ये आव्हाडांनी म्हंटले आहे
“आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना “घुसपेठीया” या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून, राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून टाकले. हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही”, असे आव्हाड म्हणाले. Jitendra Awhad Latest Tweet
त्यांना द्वेष पसरवण्याशिवाय पर्यायच नाही पुढे आव्हाड म्हणाले, “जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते; तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल, असे काही वाटत नाही. पण, देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढविल्या जाणार आहेत. कारण की, निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे सरकलेली पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरविण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही”, अशी टीका आव्हाडांनी केली आहे. Jitendra Awhad Latest Tweet
पंतप्रधान मोदी यांचे विधान काय?
दरम्यान, “पूर्वी जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा ते म्हणाले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. संपत्ती एकत्र करून हे कोणाला वाटणार? याचा अर्थ ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना ही संपत्ती वाटणार. घुसपेठियांना वाटणार. तुमच्या मेहनतीच्या कमाईचा पैसा घुसपेठियांना दिला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे का? हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत म्हणाले होते. सध्या मोदींच्या या विरोधनावर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.