Jethalal In Panvel : अभिनेता दिलीप जोशी (जेठालाल) शनिवारी कळंबोलीत
पनवेल : विनोदी मालिकेंच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल शनिवारी पनवेलकरांच्या भेटीस येत आहे. कळंबोली येथील प्रसिद्ध व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स चे शोरूम भव्य अशा स्वरूपात नवीन पत्त्यावर स्थलांतरित होत आहे. शनिवार १ जून २०२४ पासून व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स चे नवीन शोरूम ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. संध्याकाळी ५ वाजता या उद्घाटन सोहळ्यास अभिनेता दिलीप जोशी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या शोरूम चा नवीन पत्ता हा रेजेन्सी एलेंजा सी एच एस, डीमार्ट रोड, सेक्टर १० ई, कळंबोली, पनवेल हा आहे. या उद्घाटन सोहळ्यास पनवेलकरांना यावेळी विविध ऑफर याचबरोबर दिलीप जोशी यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भव्य अशा शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने पनवेलकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले.
याबाबत अधिक माहिती देताना संचालक मोहित काकडे यांनी सांगितले की कित्येक वर्षापासून आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहोत. ग्राहकांच्या सहकार्यामुळेच आज आम्ही मोठ्या जागेत शोरूम सुरुवात करून सेवा देणार आहोत. या ठिकाणी दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ग्राहकांकरिता उत्तम भावात उपलब्ध असतील.