पुणे

Jejuri Car Accident : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात — नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

PM Modi On Jejuri Car Accident : पंतप्रधान मोदींचा दु:ख व्यक्त करणारा ट्वीट, बेजबाबदार ड्रायव्हरवर कारवाईची मागणी

पुणे,जेजुरी | जेजुरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला. किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्याजवळ एका भरधाव मोटारीने थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. PM Modi On Jejuri Car Accident या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश असून, चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो थांबवून त्यातील सामान उतरवले जात असताना, पुण्याकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने टेम्पोला जबर धडक दिली. या धडकेनंतर टेम्पो पुढील गाडीला आदळला. धडकेचा जोर इतका होता की काही जणांनी जागीच प्राण सोडले. यामध्ये ढाब्यासमोर थांबलेले पादचारी व टेम्पोतील कामगारांचा समावेश आहे.

घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार माजला. घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांना मदत करताना ढाबाचालक आणि अन्य कामगारांची महत्त्वाची भूमिका होती.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करत ट्विटरवरून संवेदना व्यक्त केल्या आहेत. “या अपघातातील मृतांप्रती मी शोक व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे वाटो हीच प्रार्थना,” असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“जेजुरी मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात नऊ जणांचा जीव गेला. ही घटना दुर्दैवी आहे. माझ्या मनाला यामुळे अतीव वेदना झाला. आपल्या आप्तस्वकीयांना ज्यांनी गमावलं त्यांच्याविषयी माझ्या सहवेदना. जे या अपघातात जखमी झाले त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो.” या आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

vivek

Recent Posts