Jaydeep Apate Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, शिल्पकार जयदीप आपटेला अटक
Jaydeep Apate Arrest : सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी दुसरी अटक केली आहे. पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे याला अटक केली आहे.
कल्याण :- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj) कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार-ठेकेदार जयदीप आपटे Jaydeep Apate Arrest याला बुधवारी (4 सप्टेंबर) रात्री कल्याण येथून अटक करण्यात आली. जयदीप आपटे (24 वर्ष) यांनी बांधलेला पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस त्याचा शोध घेत होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. पुतळा कोसळल्यानंतर मालवण पोलिसांनी जयदीप आपटे Sculptor Jaydeep Apte Arrested आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर पाटील यांना गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे.