मुंबई

Jayant Patil : महाराष्ट्रात राजकीय गदारोळ वाढला, अजित पवार गटाच्या नेत्याची जयंत पाटील यांची भेट, बंद दरवाजाआड काय घडलं?

Jayant Patil Meet Babajani Durran : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

परभणी :- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil संघटनात्मक बांधणी मजबूत करत आहेत. या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी Babajani Durran यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

जयंत पाटील यांनी विधान परिषद सदस्य आणि अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट घेतल्याने बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता बळावली आहे. बाबाजानी दुर्राणी हे सध्या अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष असून त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ काही दिवसात संपत आहे. जयंत पाटील यांच्याशी त्यांची बैठक बंद खोलीत झाली.

अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke)  यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. आता अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अतुल बेनके म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0