Mumbai Rain News : हवामान विभागाचा इशारा !मुंबईत सायंकाळी गडगडाट, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांनी राहावे सतर्क

Mumbai Rain News : रत्नागिरी, रायगड, पालघरसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट
मुंबई :- मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांनी आज सायंकाळपासून विशेष सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर अधिक असण्याचा इशारा देण्यात आला आहे. Mumbai Rain News
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दादर, परळ, वरळी, प्रभादेवी या भागांमध्ये गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पावसाचा अनुभव आला होता. आजदेखील ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यासोबत विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ‘अतिवृष्टी’चा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा जारी झाला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पोषक वातावरणामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. येत्या काही तासांत मुंबईसह राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


