ठाणे

Jay Pawar Weeding : बहरीनमध्ये पवार कुटुंबाचा ‘शाही विवाह’ सोहळा! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नात ‘झिंगाट’ डान्सची धूम

Jay Pawar Weeding Latest News : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील विवाहबंधनात; सुप्रिया सुळे यांनी शेअर केले खास फोटो आणि व्हिडीओ; पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची चार दिवसीय रेलचेल

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार Jay Pawar यांचा विवाह सोहळा बहरीन येथे मोठ्या थाटात पार पडला आहे. जय पवार आणि साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. या शाही सोहळ्यासाठी पवार आणि पाटील कुटुंब बहरीनला रवाना झाले होते.

शाही वरात आणि ‘झिंगाट’ डान्स

या विवाह सोहळ्याचे अनेक खास फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर समोर आले आहेत. विशेषतः वरातीमधील डान्सचे व्हिडीओ लक्षवेधी ठरले आहेत. एका व्हिडीओमध्ये अजित पवार स्वतः ‘सैराट’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात आमदार रोहित पवार यांचा डान्सही विशेष लक्ष वेधून घेत आहे.

चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम

जय आणि ऋतुजा यांच्या लग्नपत्रिकेनुसार, पवार कुटुंबाने या खास विवाह सोहळ्यासाठी बहरीन येथे चार दिवसांचे पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 4 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत हा सोहळा पार पडत आहे.

4 डिसेंबर: मेहेंदी
5 डिसेंबर: हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा
6 डिसेंबर: संगीत (आजचा कार्यक्रम)
7 डिसेंबर: स्वागत समारंभ

मागील काही दिवसांपासून या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती आणि आता पारंपरिक पद्धतीने हा शाही सोहळा बहरीनमध्ये पार पडत आहे.

फोटो गॅलरी

vivek

Recent Posts