Jammu Kashmir News : जम्मूच्या अखनूरमध्ये LoC जवळ IED स्फोट, दोन जवान शहीद
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/IMG_4840.jpeg)
Jammu Kashmir News : जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये IED (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) स्फोटात दोन जवान शहीद झाले आहेत. ललेली येथे शोधमोहीम राबवली जात असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.
ANI :- जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये IED (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) स्फोटात दोन जवान शहीद झाले आहेत. लालेली येथील Locजवळ शोध मोहीम सुरू असताना हा स्फोट झाला. व्हाईट नाइट कॉर्प्सने सांगितले की, परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे.देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या हौतात्म्याला विनम्र अभिवादन आणि आदरांजली.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अखनूर सेक्टरमधील एलओसीजवळ भटाल भागात सैनिक गस्त घालत होते. यादरम्यान स्फोट झाला. प्राथमिक तपासात हा स्फोट इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) मध्ये झाल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांनी ते पेरले होते, असे मानले जात आहे.ते दहशतवाद्यांनी पेरले होते, असे मानले जात आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली.
आयईडी स्फोटाव्यतिरिक्त जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये आज एक मोर्टार शेल सापडला. तो बॉम्ब निकामी पथकाने निकामी केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नामंदर गावाजवळील प्रताप कालव्यात स्थानिक लोकांनी मोर्टारचा शेल पाहिला.यानंतर बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले, ज्यांनी मोर्टारचे शेल निष्प्रभ केले.