देश-विदेश
Trending

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय अवस्था होती? मतांची ही टक्केवारी मिळाली

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 0.4 टक्के मते मिळाली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला 0.5 टक्के मते मिळाली आहेत. दोघांनीही युती सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.

ANI :- 2024 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे Jammu Kashmir Assembly Elections निकाल काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीच्या बाजूने आले आहेत. येथे भाजप 29 जागांवर आघाडीवर असून फारुख अब्दुल्ला 41 जागांवर आघाडीवर आहेत. त्याचबरोबर काँग्रेसलाही 6 जागा मिळत आहेत. याशिवाय मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाला 4 तर अपक्षांना 7 जागा मिळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. निवडणूक निकालांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0.04 टक्के, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0.05 टक्के मते मिळाली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होत असून पक्ष 20 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0