Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates : जम्मू-काश्मीरमधील 26 जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान,9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान
Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates: श्रीनगर जिल्ह्यात 93 उमेदवार, बडगाममध्ये 46, राजौरी जिल्ह्यात 34, पूंछ जिल्ह्यात 25, गांदरबलमध्ये 21 आणि रियासीमध्ये 20 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
ANI :- जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या Jammu & Kashmir Assembly Elections दुसऱ्या टप्प्यासाठी आज (बुधवार, 25 सप्टेंबर) 26 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 239 उमेदवार निवडणूक लढले आहेत. सुमारे 25 लाख मतदार आज घराबाहेर पडून मतदान करतील आणि सर्व उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
2014 पासून आतापर्यंत 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24 जागांसाठी मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates
जम्मू काश्मीर 2024 विधानसभा निवडणुकीत सकाळी 9.00 वाजेपर्यंत पूंछमध्ये सर्वाधिक आणि श्रीनगरमध्ये सर्वात कमी मतदान झाले.
[Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates]
- बडगाम — 10.91%
- गांदरबल – 12.61%
- पूंछ– 14.41%
- राजौरी– 12.71%
- रियासी– 13.37%
- श्रीनगर– 4.70%