देश-विदेश
Trending

Jammu and Kashmir News: काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे 4 जवान जखमी, परिसरात शोध मोहीम सुरू

Jammu and Kashmir News: काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे.

ANI :- काश्मीरमधील Jammu and Kashmir कुलगाममधील Kulgam आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना भारतीय लष्कराने सांगितले की,विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, आज भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर यांनी कुलगामच्या अरिगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि गोळीबार झाला. ऑपरेशन चालू आहे”कुलगाममधील आदिगम देवसर भागात चकमक सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दल हजर आहे. पुढील माहिती लवकरच शेअर केली जाईल.” दरम्यान, दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे.

या कारवाईत लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचाही सहभाग आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सतत अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी खोऱ्यात सतत शोधमोहीम राबवली जात आहे.

शुक्रवारी पोलिसांनी अवंतीपोरा, पुलवामा येथे दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. ते तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असत.पोलिसांनी त्यांच्याकडून 5 आयईडी, 30 डिटोनेटर, आयईडीच्या 17 बॅटरी, 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 25 राउंड, 4 हातबॉम्ब आणि 20 हजार रुपये रोख जप्त केले आहेत. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0