Jalna Crime News : जालना जिल्हा ; लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
•Jalna Crime News तलाठ्याची लाचेची अजब मागणी, दोन हजार सह , आर एस कॉटर ची लाच
जालना :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी गेल्या दहा दिवसात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून अनेक यशस्वी लाचखोर सरकारी बाबुंना लाच स्वीकारताना अटक केल्याच्या घटना समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील तलाठी सजा निरखेडा रायगड नगर जालना येथे कार्यरत असलेल्या तलाठी कैलास खंडोजी ढाकणे (56 वर्ष), तलाठी यांच्या खाजगी मदतनीस सुदर्शन दादाराव वाडेकर (34 वर्ष) यांना 1500 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी अटक केली आहे. तसेच तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे अजब लाच मागत चक्क देशी दारू आणि आर एस क्वार्टर ची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी मौजे निरखेडा शिवारातील शेती गट क्रमांक 109 मधील 24 आर शेती विकत घेतली आहे. शेत जमिनीचे फेर नोंद घेण्यासाठी तक्रारदार हे तलाठी यांना 23 एप्रिल 2024 रोजी पंचासमक्ष भेटले. त्यावेळी तलाठी यांनी तक्रारदार यांचे कडे त्यांचे शेतीचा फेर घेण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच आरोपी खाजगी इसम याने तलाठी याचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडे R.S दारूच्या क्वार्टर ची मागणी केली आहे. तलाठी ढाकणे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे. आलोसे व खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे कदिम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,छत्रपती संभाजी नगर ,किरण बिडवे,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, जालना. यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर म.मुटेकर, पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, जालना,गजानन कांबळे, अतिश तिडके , गजानन खरात, गजानन घायवट,संदीपान लहाने अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना. यांनी सापळा रचून तलाठी कैलास ढाकणे आणि त्यांचा साथीदार सुदर्शन वाडेकर यांना अटक केली आहे.