•Jalna Crime News लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; लाचखोर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला केले अटक, पाच हजाराची मागितली होती लाच
जालना :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांनी जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक करण्यात आली आहे. सॅमसग छबुराव कसबे (34 वर्ष) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला पाच हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे.
पाच हजार स्वीकारताना कर्मचाऱ्याला अटक
तक्रारदार यांनी महानगरपालिका जालना यांची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याबाबत त्यांना महाराष्ट्र प्राधिकरण नगर रचना अधिनियमन 1966 कलम 53 (1) नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस रद्द करण्याचे असेल तर 5000 रुपये द्यावे लागेल असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. कसबे यांनी नोटीस रद्द करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचखोर कर्मचाऱ्यांच्या विरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांचा पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, राजीव तळेकर, पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.GB छत्रपती संभाजी नगर.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे पोलीस हवालदार जीवडे , पोलीस नाईक रवी काळे, अशोक नागरगोजे चालक पो अमलदार रावते. दैठणकर छत्रपती संभाजी नगर, यांनी आयुक्त महानगरपालिका जालना, यांच्या समक्ष लाचखोर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…