क्राईम न्यूजमुंबई
Trending

Jalna Bribe News : जालना जिल्ह्यातील अंबड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दोन हजारांची लाच घेताना अटक

Anti Corruption Bureau Arrested Jalna Ambad Officer For Taking Bribe : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यकाला दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

जालना :- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे कार्यान्वित असलेल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना Jalna Ambad Officer 2 Taking Bribe लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजी विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. Chatrapati Sambhaji Nagar ACB देवानंद कारभारी डोईफोडे (37 वय) असे लाच घेताना पकडलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आढाव, पोलीस उपअधीक्षक बाळु जाधवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारे 57 रुपयाची शासकीय ऑनलाईन पद्धतीने फ्रि 13 सप्टेंबर 2023 रोजी भरली होती. कागदपत्राचे पूर्तता करूनही उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक देवानंद डोईफोडे यांनी जात प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. बनसोडे यांच्या विरुद्ध तक्रारदार यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंबड येथे लिखित तक्रार दाखल केली होती. एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय कार्यालय येथे सापळा रचून महसूल सहाय्यक यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0