Jalna Bribe News : फेर दुरुस्तीबाबत आदेश काढण्यासाठी 20 हजाराची लाच घेणारा इंदेवाडी जालन्याचा तलाठी पवार ACBच्या जाळ्यात
•तहसीलदार आणि पेशकार यांच्या नावाने तलाठी ने मागितली 20 हजार रुपयांची लाच
जालना :- इसारपावतीकरून घेतलेल्या जमिनीचे खरेदी करणे असल्याने खरेदीसाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक असते फेर दुरुस्तीचे आदेश काढण्यासाठी इंदेवाडी, जिल्हा जालना येथील तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार (46 वय) यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. तलाठी यांनी तहसीलदार आणि पेशकार यांच्या नावाने वीस हजार रुपयांची तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.या कारवाईमुळे तालुक्यातील महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी इसारपावती करून घेतलेल्या जमिनीची खरेदी करणे असल्याने, खरेदीसाठी फेर दुरूस्ती करणे आवश्यक आहे .म्हणून फेर दुरुस्ती बाबत जालना तहसीलदार यांचा कलम 155 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार आदेश काढण्यासाठी तहसीलदार मॅडम व पेशकार शिंदे यांचेकरिता तलाठी शिवदास पवार याने दिनांक 18 डिसेंबर रोजी 20 हजारांची लाचेची मागणी केली आहे.आज 19 डिसेंबर रोजी पंचा समक्ष तलाठी पवार यांनी स्वतः वीस हजार रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारली असता तलाठ्याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तलाठी पवार यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर जालना पोलीस ठाणे तालुका येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर.मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी बाळु एस. जाधवर, पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि जालना सापळा पथक पोलीस हवालदार गजानन घायवट, गणेश चेके, कृष्णा देठे, गणेश बुजाडे यांनी कारवाई करत तलाठ्याला ताब्यात घेतले आहे.