शेतजमिनीच्या फेरफार प्रकरणात निकाल लावण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला अटक”
जालना :- तहसील कार्यालयातील प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau – ACB) जालना युनिटने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 14 मे रोजी जालना तहसील कार्यालयात करण्यात आली.
आरोपी अधिकारी राजेंद्र श्रीपतराव शिंदे (वय 41),सहाय्यक महसूल अधिकारी (वर्ग 3), (रा. मातोश्री कॉलनी, इंदेवाडी, जालना,) यांनी फेरफार क्रमांक 17726, 17727 व 17728 आणि क्षेत्र दुरुस्ती संदर्भातील प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची तक्रार ACB कडे केली होती.
लाच मागणीची पडताळणी 15, 17, 21 व 22 एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. त्यानंतर सापळ्याचे नियोजन 14 मे रोजी करण्यात आले. मात्र शिंदे यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही, तरीही त्यांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून रोख 785 रुपये व शाओमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्यांचे घरझडतीचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यांच्यावर जालना पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई शंकर मुटेकर (पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक), मुकुंद आघाव (अपर पोलीस अधीक्षक) व बाळू जाधवर (पोलीस उप अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…