Jalna Bribe News : बंधाऱ्याच्या बांधकामासाठी 45 हजारांची लाच घेणा-या जालन्याच्या जल संधारण अधिकाऱ्यास अटक

Jalna Latest Bribe News : बंधा-याच्या बांधकामासाठी मटेरियल सप्लाय करणाऱ्या तक्रारदार यांच्याकडून 45 हजारांची लाच स्वीकारणा-या उपविभागीय जल संधारण अधिकारी यांना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले आहे
जालना :- बंधा-याच्या बांधकामासाठी मटेरियल सप्लाय करणाऱ्या ठेकेदाराकडून 45 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उपविभागीय जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याला एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.jalna Latest Bribe News मुजाहेद वलिमीया शेख (30 वय) असे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद जालना उपविभागीय अंबड यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ST स्टँड रोड वरील दिपाली पेट्रोल पंपासमोर जालना,लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात Chandanzera Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Jalna Anti Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,जिल्हा वार्षिक योजना सन 2023 – 2024 अंतर्गत लेखाशीर्ष 2702 – 6051 ल.पा योजना मधून जिल्हा परिषद जालना कडून ग्रामपंचायत घोन्सी खु. ता. घनसावंगी येथे सिमेंट नाला बंधारा मंजूर झाला होता. ग्रामपंचायत घोन्सी खु यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्यासाठी 16 ऑक्टोंबर 2024 रोजी इ निविदा काढून 4 लाख 79 हजार 850 रुपयेचे टेंडर राजलक्ष्मी बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांना दिले. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना घोन्सी खु. ता. घनसावंगी येथील सिमेंट नाला बंधारे यास मटेरियल सप्लाय करण्याबाबत काम दिले. त्यानुसार तक्रारदार यांनी घोन्सी खु. ता. घनसावंगी येथील सिमेंट बंधारे यास बांधकाम मटेरियल चा पुरवठा केला. त्यानंतर सदर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता राठोड यांनी 14 लाख 64 हजार 273 रुपयाची MB व बिल तयार करून तक्रारदार यांना दिले. MB व बिलावरती सही करण्यासाठी आमुजाहेद वलिमिया शेख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद जालना, उपविभाग अंबड यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना 50,000 रुपयांची लाच मागणी करून तडजोडी अंती 45,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारताना रंगेहात पडण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात चंदनझिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी चे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक बाळू जाधवर पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना शंकर म.मुटेकर, पोलीस हवालदार तिडके, पोलीस अंमलदार गजानन कांबळे, अशोक राऊत, भालचंद्र बिनोरकर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.