Jalna Bribe News : घरकुलच्या दुसऱ्या हप्त्यासाठी घेतली लाच, कंत्राटी अभियंत्यांवर कारवाई

•जालन्यातील भोकरदन तालुका येथे घरकुलच्या प्रकरणात 5 हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
जालना :- घरकुलाचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांना एसीबी कडून अटक करण्यात आली आहे. प्रदीप रंगनाथ राठोड (32 वय) असे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचे नाव आहे. पंचायत समिती भोकरदन येथे कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत होते.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या चुलतीला पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या घरकुलाचा दुसरा हफ्ता देण्यासाठी कंत्राटी गृहनिर्माण ग्रामीण अभियंता भोकरदन यांनी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने भोकरदन येथे लिखित तक्रार दिली होती. एसीबीने पडताळणी करून कंत्राटी अभियंता याला 5000 रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.
एसीबीने सांगितल्याप्रमाणे आरोपी यांनी 28 फेब्रुवारीच्या दरम्यान तक्रारदार यांच्याकडून पंचायत समितीच्या पार्किंग मध्ये पाच हजार रुपये रोख रक्कम घेतली. त्यानंतर कार्यालयाच्या समोर असलेल्या हिंदुस्थान झेरॉक्स आणि एसबीआय ग्राहक सेवा केंद्र येथे तक्रारदार यांना सोबत घेऊन एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे चालक अस्लम बेग यांच्याकडे देऊन स्वतःच्या अकाऊंटवर टाकण्यास सांगितले. त्यानंतर प्रदीप राठोड यांनी स्वतःच्या अकाउंटवर ती रक्कम घेतली. एसीबीने ती रक्कम ग्राहक केंद्राचे चालक अस्लम बेग यांच्याकडून जप्त करून आरोपी प्रदीप राठोड यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात भोकरदन ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.