महाराष्ट्र

Jalna Accident News : जालन्यात ट्रकच्या धडकेत तीन पादचाऱ्यांचा मृत्यू, चालकाला अटक

Jalna Accident News : जालना येथे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना :- जिल्ह्यात भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना धडक दिली आणि या घटनेत एका सहा वर्षीय मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक बालक जखमी झाला. (Jalna Accident News) पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

जालना शहरापासून 65 किमी अंतरावर असलेल्या मंठा (Mantha) गावात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. सीमा चव्हाण (34 वर्ष), रामचंद्र राठोड (60 वर्ष) आणि मारिया पठाण (6 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने (Eicher Truck) पादचाऱ्यांना धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. Jalna Accident News

चव्हाण आणि पठाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले, तर राठोड यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात प्राण गमावलेली सीमा यांची चार वर्षांची मुलगी रसिका चव्हाण गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. Jalna Accident News

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts