Anti Corruption Bureau Arrested Talathi For Taking Bribe : तलाठी सज्जा जालना येथे 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
जालना :- शेती जमीन विकत घेतल्यानंतर सातबारा उताऱ्यावर फेर घेण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी 25 हजारांची लाच मागणाऱ्या जालना येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. Anti Corruption Bureau आज (6 नोव्हेंबर) ही कारवाई झाली. दुर्वेश गणेश गिरी Durvesh Giri Talathi Bribe News (44 वय ) असे तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांनी जालना शहरातील शेती जमीन सर्वे नंबर 284 मधील प्लॉट नंबर 40 हा खरेदी केला असून सदर प्लॉटचा फेर घेण्यासाठी तलाठी गिरी यांनी तक्रारदार यांना दिनांक 5 नोव्हेंबर रोजी लाच मागणी पडताळणी मध्ये 25 हजार रुपये लाचेचे मागणी करून लाचेची रक्कम गिरी, तलाठी सजा जालना यांनी आज 6 नोव्हेंबर रोजी पंचा समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे . तलाठी यांच्या वरती पोलीस ठाणे कादिम जालना येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, बाळु जाधवर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.जालना, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- शंकर म .मुटेकर पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि जालना सापळा पथक – पोलीस हवालदार गजानन खरात,भालचंद्र बिनोरकर, अतिश तिडके, गजानन कांबळे.
तलाठी यांचे सक्षम अधिकारी- जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तलाठ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.