Jalna ACB Trap News : थकीत बिलासाठी आठ हजारांची लाचेची मागणी, जालन्यातील वरिष्ठ लिपिकाला अटक
Jalna ACB Trap News : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग येथील भाडेतत्त्वावर असलेल्या कारचे मागील तीन महिन्याचे थकीत बिल 1.25 लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या बेड्या
जालना :- जालन्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील भाडेतत्त्वावर असलेल्या बोलेरो जीप चे मागील तीन महिन्यांपासून थकीत बिल मंजूर करण्यासाठी उपविभागीय परतुर येथील कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने 1.25 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला एसीबीने ताब्यात घेतली आहे. अमोल रमेश यन्नावार (47 वय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना) वरिष्ठ लिपिकांचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनीही कारवाई केली आहे. Jalna ACB Trap News वरिष्ठ लिपिक अमोल यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तक्रारदार हे चालक असुन त्यांची बोलेरो जीप Mh 46 P 8184 ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग परतुर येथील कार्यालयात भाडेतत्त्वावर असुन त्या गाडीची मागील तीन बिले एकूण 1.25 लाख मंजुर करण्यासाठी साहेबाचे 5 हजार रु व स्वतः करिता 3 हजार रु असे एकूण 8 हजार रुपयांची लाच मागणी केली. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकास जालना येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने 3 फेब्रुवारी रोजी जालना येथे आरोपीताचे कार्यालयात पडताळणी केली असता,आरोपीने पंचांसमक्ष साहेबाचे 5 हजार स्वतः करिता 3 हजार रु असे एकूण 8 हजार रु लाचेची मागणी केली.
आरोपी अमोल याने आरोपीचे सक्षम अधिकारी परिमंडळ अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , छत्रपती संभाजी नगर 3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांचेकडून 8 हजार रुपये कार्यालयात स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर,परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – पोलीस उप अधिक्षक बाळु जाधवर सापळा पथक:- पोलीस अंमलदार – घायवाट, चेके, बुजाडे, लहाने,खुळे यांनी कारवाई करत वरिष्ठ लिपिकाला ताब्यात घेतले आहे.