क्राईम न्यूज

Jalna ACB Trap News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं, कृषी सहाय्यक अधिकाऱ्याच्या अटकेने कृषी विभागात खळबळ

Jalna Latest Bribe News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत लाच घेताना कृषी विभागाचा कृषी सहाय्यक अधिकारी जाळ्यात सापडला आहे. घनसावंगी तालुका येथील कृषी सहाय्यक अधिकारी भास्कर प्रभाकर हरणे यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे

जालना :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मधील सिताफळ फळबागाचे लागवडीसाठी फोटो जिओ टॅगिंग करण्यासाठी आणि फळबाग मस्टर मंजूर करण्यासाठी घनसावंगी तालुका येथील कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी पथकाने रंगेहाथ पकडले. Jalna Agriculture Officer Bribe News भास्कर प्रभाकर हरणे (35 वय ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याचे नाव आहे. Jalana Bribe News

तक्रारदार यांचे मौजे शिंदे वडगाव तालुका घनसावंगी, जिल्हा जालना शिवार शेती गट क्रमांक 238 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मधील सिताफळ फळबाग पिकाचे लागवडी साठीचे फोटो जिओ टॅगिंग करण्यासाठी आणि फळबाग मस्टर मंजूर करण्यासाठी कृषी सहाय्यक अधिकारी भास्कर हरणे यांनी तक्रारदार यांना पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आहे.लाचेची रक्कम तीन रुपये पंचा समक्ष कृषी सहाय्यक अधिकारी भास्कर हरणे यांना पडण्यात स्वीकारताना रंगेहात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत घनसावंगी पोलीस ठाण्यात ghansanghavi Police Station गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी पथक

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव ,अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,बाळू जाधवर पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. जालना यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर म.मुटेकर पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना पोलीस हवालदार तिडके, पोलीस अंमलदार गजानन कांबळे, गजानन खरात, भालचंद्र बिनोरकर ला. प्र. वि. जालना यांनी कारवाई केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago