Eknath Khadse Home Robbery News : सात-आठ तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास; राजकीय विरोधकांकडे बोट?
जळगाव :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगरमधील निवासस्थानी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. या चोरीत चोरट्यांनी सात ते आठ तोळे सोने आणि 35 हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, चोरट्यांनी केवळ एका तासात हातसफाई केल्याचे दिसून आले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
चोरीच्या घटनेनंतर आज (29 ऑक्टोबर 2025) एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल झाले. त्यांनी घरात काय-काय चोरीला गेले याचा आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.
‘चोरट्यांचा उद्देश कागदपत्रे चोरणे’
एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही चोरी ‘भुरट्या चोरांचे काम नाही’ असे सांगत, यामागे मोठा कट असल्याचा संतोवाच केला. त्यांनी थेट राजकीय विरोधकांकडे बोट दर्शवत गंभीर आरोप केला.
खडसेंचा आरोप: “चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या सीडी (CDs), आणि पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच ही चोरी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.”
चोरी गेलेला ऐवज: चोरट्यांनी दहा सीडीज आणि घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी केला.
उद्देशावर प्रश्न: “चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता, तर माझ्या घरातली कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, सीडी चोरून नेण्याच्याच उद्देशाने ही चोरी झाली,” असे खडसे म्हणाले.
सध्या मी कोणाचेही नाव घेऊ शकत नाही किंवा आक्षेप घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उर्वरित शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्रे पोलिसांना दाखवून त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून तपास सुरू
काल पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सुमारे 868 ग्रॅम सोनं आणि 35 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरला आहे. सध्या घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांकडून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पोलीस ठाण्याचे स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…