मुंबई

Jain Muni On Raj Thackeray : राज ठाकरेच भाषावाद संपवू शकतात!” – कबूतरखान्यावरून जैन मुन्नी निलेशचंद्र यांचे मोठे वक्तव्य, प्रत्येक वॉर्डात ‘कबूतर रक्षक’ मोहीम

Jain Muni On Raj Thackeray : “मराठी आणि मारवाडीला वोट बँकसाठी भ्रमित करणं सुरू;” – दादरच्या कबूतरखान्यावर खाद्य टाकण्याची परवानगी मिळेपर्यंत जनजागृती सुरू ठेवण्याचा निर्धार; राज ठाकरे यांनी संवाद साधण्याचे आवाहन

मुंबई :- दादर येथील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी आज (8 डिसेंबर) एक अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षवेधी विधान केले आहे. त्यांनी मराठी आणि मारवाडी समाजातील कथित भाषावादाच्या मुद्द्यावर थेट भाष्य करत, या वादाला केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच मूठमाती देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पशू-प्राणीमात्रांसाठी जनजागृती करण्यासाठी आजपासून प्रत्येक इमारतीत (टॉवर) जाऊन प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली: “आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत, तसे ‘कबूतर रक्षक’ तयार करत आहोत.”

राज ठाकरे आणि महाराष्ट्राबद्दल आदर

जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करताना, “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर महाराष्ट्रावर प्रेम करणारा कोण असेल, तर ते राज ठाकरे आहेत,” असे म्हटले. तसेच, त्यांनी थेट राज ठाकरे यांना आवाहन केले की, “तुम्ही आमच्या जैन समाजाशी बोलावं, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू.”
ते म्हणाले, “जेवढा सन्मान तुम्ही मराठी भाषेचा करता, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मारवाडी करतो.” त्यांनी स्पष्ट केले की, “आमचा जन्म जरी राजस्थानमध्ये झालाय, पण आमची कर्मभूमी आणि मोठी आई महाराष्ट्र आहे.” प्रत्येक फ्लॅटवर ‘जय महाराष्ट्र, जय जिनेन्द्र’ आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराणा प्रताप यांचे फोटो कायम राहणार, असे त्यांनी सांगितले.

कबूतरखान्यावरील लढा

राज्य आणि केंद्र सरकारने दोन तास कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली असताना, दादरच्या कबूतरखान्यावर ही परवानगी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “जोपर्यंत दादरच्या कबूतरखान्याला दोन तासाची खाद्य टाकण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ही जनजागृती सुरू राहणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago