•सहकाऱ्यांनी वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला
मुंबई :- जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, या रुग्णालयातीलच एका महिला डॉक्टरने वसतिगृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. सुदैवाने वेळेवर उपचार झाल्यामुळे त्या डॉक्टरचा जीव वाचला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
औषधांचे अति सेवन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न
संबंधित महिला डॉक्टरने वसतिगृहातील आपल्या खोलीत औषधांचे अतिरिक्त सेवन केले होते.
मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच ही बाब लक्षात घेत, त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केले.वेदनादायक बाब म्हणजे, अलिकडेच अटल सेतूवरून उडी मारून एका डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच ही दुसरी घटना घडली.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून स्वतंत्रपणे चौकशी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.एक समिती रुग्णालय पातळीवर तर दुसरी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून नेमण्यात आली असून,
या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी स्पष्ट केले.
सदर महिला डॉक्टर मूळच्या उत्तर प्रदेशातील असून, त्यांच्या आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या वातावरणात निर्माण होत असलेल्या मानसिक दबावावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…