IPS Shivdeep Lande | IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता पोलीस महानिरीक्षक पदावर बढती
IPS Shivdeep Lande
IPS Shivdeep Lande Resignation cancelled
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
IPS Shivdeep Lande | महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र डॅशिंग आयपीएस अधिकारी IPS शिवदीप लांडें यांचा राजीनामा अखेर नामंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी शिवदीप लांडेंच्या राजीनाम्यावरून बिहारसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने ते राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार का, अशीही चर्चा रंगली होती.
IPS शिवदीप लांडें (IPS Shivdeep Lande) यांचा राजीनामा स्वीकारण्यात न आल्याने त्यांना बिहार राज्यातच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आता, त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. बिहार राज्यातील पाटणा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चर्चाना पूर्णविराम…
शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय श्रीगणेशाची सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, आता त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. IPS officers News
शिवदीप लांडे यांनी गेल्या 2 आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला, तेव्हा ते पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून तैनात होते. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची पूर्णिया रेंजचे आयजी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते तिरहुत रेंजचे आयजी होते. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची नेहमीच कठोर भूमिका राहिली. लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीआयजी म्हणून काम केले आहे. आता, त्यांच्याकडे बिहार राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार देण्यात आला आहे. बिहारच्या गृह विभागाने त्यांच्या बदलीचे पत्रही जारी केले आहे. Mumbai News, Pune News, Maharashtra News,