मुंबई | प्रतिनिधी विशेष :
“पोलीस दलात आता प्रामाणिक अधिकारी उरलेच नाहीत! पैसे न खाणारा एकही पोलीस अधिकारी महाराष्ट्रात नाही!” —
असं स्फोटक वक्तव्य राज्यातील ज्येष्ठ निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी करताच प्रशासन आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मीरा बोरवणकर IPS Meera Borwankar या पोलीस दलातील Maharashtra Police अत्यंत निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र, त्यांनीच आता दलाच्या आतल्या गंधकासारख्या वास्तवावर बोट ठेवत “प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रोज पैसा जमा होतो — मग तो शिपाई असो की अधिकारी, भ्रष्टाचाराचं जाळं सर्वत्र पसरलंय!” असा थेट आरोप केला आहे. Maharashtra Police Corruption News
त्यांनी पुढे म्हटलं —
“आजच्या महाराष्ट्रात ‘पोलीस’ ही सेवा न राहता ती ‘व्यवसाय’ बनली आहे.
प्रत्येक कारवाई, प्रत्येक तपास, प्रत्येक FIR मागे पैसा फिरतोय.
ही प्रवृत्ती वाढल्यामुळे खऱ्या अर्थाने ‘पॉलिसींग’ महाराष्ट्रात संपलं आहे!”
या वक्तव्याने संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजली असून, अनेक अधिकारी अंतर्मुख झाले आहेत.
राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय!
मीरा बोरवणकर यांचं हे विधान म्हणजे जणू सत्ताधाऱ्यांनाच आरसा दाखवणारा चपराकच आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी आवाज उठवणाऱ्या बोरवणकर यांनी या वेळी थेट पोलिस दलावरच हल्ला चढवला आहे.
सामान्य नागरिकांच्या मनात आधीच “पोलीस = पैसा” अशी धारणा निर्माण झाली असताना, एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांकडून आलेलं हे वक्तव्य म्हणजे ‘सिस्टिमच्या अंत्यसंस्कारावरचं शोकगीत’ असल्याचं भाष्य सोशल मीडियावर होत आहे. Maharashtra Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…