मुंबईमहाराष्ट्र

IPL2025 : LSG आणि MI यांच्यातील सामना, जाणून घ्या लखनौ-मुंबईचे प्लेईंग इलेव्हन

IPL2025 : IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना आहे. या हंगामातील हा 16 वा सामना आहे. दोन्ही संघ लखनौच्या इकाना येथे भिडतील.

IPL2025 :-आज IPL 2025 मध्ये एक रोमांचक सामना खेळवला जाणार आहे. Mumbai Vs LSG ऋषभ पंतचा लखनौ सुपर जायंट्स आणि हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्स लखनौच्या एकना स्टेडियमवर भिडणार आहेत. दोन्ही संघांसाठी यंदाचा हंगाम चांगला जात नाही. गुणतालिकेत मुंबई सहाव्या, तर लखनौ सातव्या स्थानावर आहे.

हार्दिकच्या MI ने IPL 2025 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या कालावधीत, त्याने फक्त एकच सामना जिंकला आहे. चांगली गोष्ट म्हणजे मुंबईचा नेट रन रेट बऱ्यापैकी आहे. अशा स्थितीत संघाला दमदार पुनरागमन करण्याची संधी आहे. लखनौबद्दल बोलायचे तर ऋषभ पंतलाही आपल्या संघासाठी फक्त एकच सामना जिंकता आला आहे.त्यांना दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यांनाही यात सुधारणा करावी लागेल.

लखनौ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव.

मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार आणि विघ्नेश पुथुर/सत्यना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
14:38