IPL Update: दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जमधून बाहेर, धोनी संघाचे नेतृत्व करेल

IPL News : चेन्नई सुपर किंग्जने पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला संघाचे नेतृत्व सोपवले आहे. धोनी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सीएसकेचा कर्णधार बनला आहे.
IPL 2025 :– आयपीएल 2025 च्या मध्यात चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाला आहे. गायकवाडची दुखापत इतकी गंभीर आहे की तो या हंगामात पुढे खेळू शकणार नाही.गायकवाडचा जखमी आहे. याबद्दल, चेन्नई सुपर किंग्जने एक्स द्वारे एक अपडेट शेअर केले आहे. आता संघाचे नेतृत्व कोण करेल हे देखील सीएसकेने सांगितले आहे.
सीएसकेने पुन्हा एकदा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद सोपवले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली, सीएसकेने एकूण पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. चेन्नईने 2010,2011,2018,2021 आणि 2023 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. 2022 च्या हंगामात धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले.