क्रीडा
Trending

IPL Final : पावसाची झुलफ आणि अंतिम सामना: अहमदाबादमध्ये IPL 2025 चा थरार आज!

IPL Final Latest Update : अंतिम फेरीत पावसाचा संभाव्य विघ्नसंग, चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली

IPL Final 2025 RCB Vs PBKS – आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे दोन संघ पहिल्यांदाच विजेतेपदाच्या शर्यतीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, चाहत्यांच्या उत्साहावर पावसाचं सावट घोंगावत आहे. याआधी क्वालिफायर-2 पावसामुळे रखडल्याने आजच्या सामन्याबाबतही अनिश्चिततेचं वातावरण आहे.

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि बँगलोरचा नेतृत्वकर्ता रजत पाटीदार यांच्यासाठी ही संधी ऐतिहासिक ठरू शकते. दोघेही नव्याने संघाचे नेतृत्व करत असून अंतिम सामन्याचा दडपणात सामना कसा करतात, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

प्रसारणाविषयी बोलायचं झालं तर, सामना स्टार स्पोर्ट्सवर आणि डिजिटली जिओ हॉटस्टारवर थेट पाहता येणार आहे.

संभाव्य पंजाब किंग्सची प्लेइंग 11 :- प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंह, अझमतुल्लाह ओमरझाई, काईल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि इम्पॅक्ट प्लेअर – प्रभसिमरन सिंग

संभाव्य आरसीबीची प्लेनिंग-11:- विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार) लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर – मयांक अग्रवाल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0