क्रीडाठाणेमुंबई
Trending

IPL Auction 2026 : आयपीएल-2026 लिलावाचा आज ‘महा-संग्राम’! – अबू धाबीतून जगातील 350 खेळाडूंवर लागणार विक्रमी बोली

IPL Auction 2026 : आज दुपारी 2.30 वाजता सुरू होणार ऑक्शन; फ्रँचायझींच्या पर्समध्ये 237.55 कोटींची रक्कम; कोणत्या चॅनलवर पाहाल लाइव्ह?


IPL Auction 2026 :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 स्पर्धेसाठीचा बहुप्रतिक्षित लिलाव आज, 19 डिसेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबी येथे पार पडणार आहे. दोन मेगा लिलावांच्या मधला हा मिनी लिलाव भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल आणि यामध्ये जगभरातील खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे.

लिलावातील महत्त्वाची आकडेवारी

दहाही फ्रँचायझींनी काही खेळाडूंना रिलीज केल्यानंतर, त्यांच्या संघांमध्ये आता एकूण 77 जागा रिकाम्या आहेत. म्हणजेच, जास्तीत जास्त 77 खेळाडूंनाच या लिलावात खरेदी केले जाईल. या खरेदीसाठी सर्व फ्रँचायझींच्या पर्समधील एकूण रक्कम 237.55 कोटी रुपये इतकी आहे.

या लिलावासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नोंदणी केली होती.

त्यापैकी बीसीसीआयने केवळ 350 खेळाडूंची निवड केली आहे.

या 350 निवडक खेळाडूंमध्ये 240 भारतीय आणि 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या संघांना सर्वाधिक खेळाडूंची आवश्यकता आहे आणि तेच आज मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.फ्रँचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंच्या जागी संघ बांधणीसाठी आवश्यक असलेल्या खेळाडूंवर आज मोठी बोली लागणार आहे.

लिलाव कुठे पाहता येईल?

आयपीएल 2026 चा हा थरारक मिनी लिलाव आपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि ऑनलाईन जिओ हॉटस्टार ॲपवर लाइव्ह पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0