IPL 2025 Update : ‘करो या मरो’च्या सामन्यात मुंबई इंडियन्स दमदार विजय, गुजरात टायटन्सला ,20 धावांनी हरवून क्वालिफायरमध्ये धडक

•मुंबईने 229 धावांचे आव्हान उभारले, गुजरातचा पाठलाग 208 धावांवर थांबला, बुमराह-ग्लीसनच्या भेदक गोलंदाजीने मुंबईच्या विजय
IPL2025 :- मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना वादळी फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला आहे. मुंबईच्या प्रत्येक फलंदाजाने योगदान देत धावसंख्येत हातभार लावला आहे.मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 228 धावांचा मजबूत डोंगर उभारला. रोहित शर्मा (81), जॉनी बेयरस्टो (47), सूर्यकुमार यादव (33), आणि तिलक वर्मा (25) यांनी दमदार फटकेबाजी केली. हार्दिक पंड्याने फटकेबाजीला गती देत 9 चेंडूत 22 धावा केल्या.
गुजरात टायटन्ससाठी 229 धावांचे आव्हान मोठे होते आणि त्यांचा पाठलाग 208 धावांवरच थांबला. जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसन यांनी अंतिम षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत गुजरातच्या संघाचा दम तोडला. त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सला 20 धावांनी विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला.



