Mi Vs DC Highlights : सूर्यकुमार यादवची नाबाद 73 धावांची दमदार खेळी,बुमराह-सॅनटनरची धारदार गोलंदाजी
मुंबई :- आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. Mumbai Qualify For Playoff बुधवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी पराभूत करत आपली ताकद दाखवून दिली. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपला. Mi Vs DC Highlights
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 बाद 180 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत नाबाद 73 धावा करत शानदार फटकेबाजी केली. त्याला रेयान रिकेल्टन (25), विल जॅक्स (21), तिलक वर्मा (27) आणि नमन धीर (नाबाद 24) यांची उत्तम साथ मिळाली. शेवटच्या दोन षटकांत सूर्यकुमार व नमनने मिळून 48 धावा कुटल्या.
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा डाव 18.2 षटकांत 121 धावांत संपुष्टात आला. समीर रिजवीने सर्वाधिक 39 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि मिचेल सॅनटनर यांनी प्रभावी गोलंदाजी करत दिल्लीला कोलमडवले.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले, “माझ्या पत्नीने आज मला एक खास गोष्ट सांगितली – तू मॅन ऑफ द मॅच सोडून सगळे पुरस्कार घेतले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार तिच्यासाठी. संघासाठी ही खेळी खूप महत्त्वाची होती आणि आम्ही हा क्षण साजरा करणार आहोत.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…