IPL 2025 LIVE: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल 2025 चे आयोजन रद्द केले आहे. केंद्र आणि सर्व फ्रँचायझी आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
ANI :- भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल 2025 चे आयोजन रद्द केले आहे. आता आजपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. केंद्र आणि सर्व फ्रँचायझी आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. आजपासून कोणताही सामना होणार नाही. IPL 2025 LIVE Updates
आयपीएलच्या लीग टप्प्यात अजूनही 13 सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये गुरुवारी रद्द झालेल्या पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्याचा समावेश आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करता आलेले नाही. आता उर्वरित सामने कधी आणि कुठे खेळवले जातील हे निश्चित झालेले नाही.आता उर्वरित सामने कधी आणि कुठे खेळवले जातील हे निश्चित झालेले नाही. सध्या बोर्डाची प्राथमिकता सर्व खेळाडूंची सुरक्षा आहे आणि लवकरच परदेशी खेळाडूंनाही त्यांच्या संबंधित देशात सुरक्षितपणे पाठवावे लागेल.
धर्मशाला येथे सामना थांबवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले होते. ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये असा दावा केला जात होता की रिकी पॉन्टिंगसह सर्व खेळाडू मायदेशी परतू इच्छितात. तथापि, धर्मशाळेतील विमानतळ बंद असल्याने सर्व खेळाडूंना ट्रेनने दिल्लीला आणले जाईल.फ्रँचायझी परदेशी खेळाडूंना परिस्थितीबद्दल माहिती देत आहे. त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे आश्वासनही देण्यात आले.
आयपीएल 2025 मध्ये, 57 सामने यशस्वीरित्या पूर्ण झाले, तर 8 मे रोजी धर्मशाळा येथे खेळला गेलेला 58 वा सामना (पीबीकेएस विरुद्ध डीसी) सुरक्षेच्या कारणास्तव मध्येच थांबवण्यात आला. पाकिस्तानने जम्मूसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले, जे भारतीय सैन्याने पाडले.परंतु खबरदारीचा उपाय म्हणून, धर्मशाळेत खेळला जाणारा सामना थांबवण्यात आला आणि खेळाडूंना हॉटेलमध्ये परत पाठवण्यात आले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…