क्रीडा

MI Vs GT IPL 2025 : गुजरात विरुद्ध मुंबई एलिमिनेटर सामना आज थरारक ठरण्याची शक्यता

शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या आमनेसामने; पराभूत संघ IPL बाहेर होणार

विजयी संघ थेट क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सशी भिडणार

IPL 2025 :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. हा सामना मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरातची धुरा युवा कर्णधार शुभमन गिलकडे असणार आहे, तर मुंबईच्या संघाचं नेतृत्त्व हार्दिक पंड्या करणार आहे.

या सामन्याचे महत्त्व अधिक असल्याचे कारण म्हणजे पराभूत संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे, तर विजयी संघ 1 जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सशी सामना करणार आहे. त्यामुळे आजचा सामना “करो या मरो” असा ठरणार आहे.

गुजरात टायटन्सने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध IPL मध्ये 7 सामन्यांत 5 विजय मिळवले आहेत. यंदाच्या हंगामात देखील त्यांनी दोन्ही सामन्यांत मुंबईचा पराभव केला आहे. त्यामुळे गुजरातचा आत्मविश्वास उंचावलेला असला, तरी प्लेऑफचा दबाव आणि मुंबईचा अनुभव सामन्याला रंगत आणणार आहे.

गुजरात टायटन्सची संभाव्य संघरचना : साई सुदर्शन, शुभमन गिल, कुसल मेंडिस (वि.), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, आर. साई किशोर, गेराल्ड कोएट्जी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई इंडियन्सची संभाव्य संघरचना : जॉनी बेयरस्टो (वि.), रोहित शर्मा, चरिथ असलंका, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago