Mumbai News : 6 वर्षांची चिमुरडी हरवली… पण पोलिसांनी ‘मिशन बचाव’ करून परत मिळवली!

•सीसीटीव्ही, रात्रभर शोधमोहीम आणि पोलिसांची तडफदार कारवाई,फक्त 6 तासांत अपहरणाचा गुन्हा उलगडत पोलिसांचं यशस्वी ऑपरेशन
मुंबई | माहिम येथून हरवलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा अवघ्या ६ तासांत यशस्वी तपास करून मुंबई पोलिसांनी तिचा शोध घेत सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द केली. ही घटना स्थानिक नागरिकांसाठी हळहळजनक असली, तरी पोलिसांची तातडीची कार्यवाही कौतुकास्पद ठरली आहे.
9 जून 2025 दरम्यान सितारा मोहम्मद आमीन हासमी यांची 6 वर्षांची मुलगी दुध आणण्यासाठी भावासोबत घराबाहेर पडली होती. परंतु ती परत न आल्याने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करत माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-5 यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही तपासात मुलगी धारावीच्या दिशेने एकटी चालताना आढळल्यावर, शोधकार्य त्वरित तिथे केंद्रित करण्यात आले.
शेवटी, रात्री 10.45 वाजता धारावी बडी मस्जिद परिसरात पोलीस उपनिरीक्षक उदय गुरव यांच्या पथकाने ती मुलगी सुरक्षित सापडली. तिची वैद्यकीय चौकशी करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.या तात्काळ आणि यशस्वी कारवाईबद्दल फिर्यादी आणि नातेवाईकांनी मुंबई पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पोपट आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भोकरे, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब पोटे, पोलीस उप निरीक्षक मच्छिंद्र सानप, पोलीस उप निरीक्षक अजय चंदनशिव, पोलीस उप निरीक्षक उदय गुरव,पोलीस हवालदार पानसकर, पोलीस शिपाई बच्छाव, पोलीस शिपाई ताडासम, पोलीस हवालदार बनकर, पोलीस शिपाई देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, पोलीस हवालदार ओतारी यांनी कारवाई केली आहे.


