क्रीडा

IPL 2025 : गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला ऑरेंज कॅप, प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर पर्पल कॅप

साई सुदर्शननं 759 धावांसह सर्वांना टाकलं मागे; मिळाली ट्रॉफी आणि 10 लाखांचं बक्षीस. प्रसिद्ध कृष्णाने 25 बळी घेऊन पटकावली पर्पल कॅप; भन्नाट कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली

IPL 2025 :- इंडियन प्रीमियर लीग 2025 हंगामाचा थरार संपन्न झाला असून या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं. मात्र या स्पर्धेत वैयक्तिक प्रदर्शनानंही तितकंच लक्ष वेधून घेतलं. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शननं यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप मिळवली, तर त्याच संघातील जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅपवर नाव कोरलं.

साई सुदर्शननं 15 सामन्यांत 759 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. या कामगिरीत त्यानं एक शतकही झळकावलं आहे. या शानदार प्रदर्शनाबद्दल त्याला ट्रॉफीबरोबर 10 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याचं नाव आयपीएलच्या यशस्वी फलंदाजांमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णा याने यंदा गोलंदाजीतील वर्चस्व सिद्ध करत पर्पल कॅप आपल्या नावावर केली. त्यानं 15 सामन्यांत 25 फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या अचूक आणि वेगवान माऱ्यामुळे तो संपूर्ण हंगामभर चर्चेचा विषय ठरला. त्यालाही पर्पल कॅपसोबत 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.

गुजरात टायटन्स संघाचं जरी अंतिम फेरीपर्यंत यंदा वाटचाल झाली नसली, तरी वैयक्तिक कामगिरीनं या दोन खेळाडूंनी संघाच्या सन्मानात भर घातली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago