क्राईम न्यूजठाणे

नौपाडा पोलिसांची मोठी कारवाई; घरफोड्या अन् वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Thane Police Latest News : वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्यांना अटक, आरोपींकडून 10 गुन्ह्यांची उकल,5.60 किंमतीचा जप्त हस्तगत

ठाणे :- नौपाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Naupada Crime Branch Unit वाहन आणि मोबाईल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 10 गुन्ह्यांची उकल करून चोरीचे 10 मोबाईल, 1 दुचाकी आणि 4 रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका ढमाळे यांनी दिली आहे. Thane Police Latest News

पोलीस आयुक्तालयात विशेषत : ठाणे परिसरात वाहन व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार सूचना व मार्गदर्शन केले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले. आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरी सुमारे 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त माहितीचे आधारे गुन्ह्यातील तिन्ही आरोपी उल्हासनगर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

आरोपींची माहिती घेत असताना पोलीसांना गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली मिळाली की, आरोपी हे नौपाडा परीसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरुन तीन हात नाका परिसरात सापळा रचला.आरोपी सलमान अली अहमद अली शेख, (वय 21, रा. रुम नं.४, कमल निवास, व्यायाम शाळेच्या बाजुला, उल्हासनगर) अहमद रजा अबुबकार सिददकी, (वय-33 , रा.टिटवाळा) यांना ताब्यात घेतले.गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे केलेल्या कौश्यल्यपुर्ण तपासात त्यांनी अनुक्रमे त्यांचे साथीदार साहील कुकरेजा, राजवीर व इम्रान शेख यांचेसह नौपाडा पोलीस ठाण्याचे हददीत वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपी हे रिक्षा, दुचाकी चोरी करतात व त्या चोरीच्या रिक्षा व दुचाकीच वापर करुन घरफोडी, चोरी करतात आरोपींकडून तपसादरम्यान चार ऑटो रिक्षा, एक शाईन मोटरसायकल, 10 मोबाईल फोन, एक कार टेप व रोख रक्कम असा एकुण 5.60 लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अहमद रजा अबुबकार सिददकी 12 चोरीचे गुन्हे दाखल आहे.सलमान अली अहमद अली शेख हिललाईन पोलीस ठाण्यात Thane Hilline police Station 1 गुन्हा दाखल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0