Invest Wisely, Avoid Scams : The Truth About the Fedrated Hermes App
ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, ऑनलाइन ट्रेडिंग लाखोचा गंडा. Federated Hermes, ॲप द्वारे फसवणूक, दहा लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक, नफ्याच्या आमिषाला बळी
ठाणे :- ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यात सर्वात महत्त्वाचे ऑनलाइन फसवणूकीत गेल्या कित्येक दिवसांपासून एकच पद्धत वापरली जाते जी पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. ती म्हणजे शेअर मार्केटच्या नावाने ऑनलाईन फसवणूक केली जाते. विशिष्ट प्रकारे ॲप तयार करून त्या ॲप मध्ये आर्थिक गुंतवणूक सांगून आर्थिक नफा मिळेल असे आमिष दाखविले जाते. त्या ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते असे सांगून अतिशय कमी रुपयात लाखोचा परतावा मिळेल असे आर्थिक आमिष दाखविले जाते. Is Your Money Safe? The Risks of Online Trading Revealed त्याद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना ठाण्याच्या कासारवडवली परिसरातील राहणाऱ्या प्रशांत तानाजी पोळ (36 वर्ष) यांच्यासोबत झाली आहे. Fedrated Harmes ॲप मध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर अधिक नफा मिळेल असे आमिष दाखविले त्याद्वारे आर्थिक फसवणूक करून दहा लाखाहून अधिक किंमतीचा ऑनलाईन गंडा घातला आहे.
जाहिरात पाहून ॲप मध्ये गुंतवणूक दहा लाखाहून अधिक किंमतीचा गंडा
प्रशांत पोळ यांना instagram खाते चेक करताना एका व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर जाहिरात पाठवली. त्या जाहिरातीमध्ये एक ॲप आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून पोळ यांनी Fedrated Harmes नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. Don’t be a Victim: How to Spot and Avoid Online Investment Scams त्यानंतर त्या ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यातील एकूण दहा लाख 4 हजार 465 रुपयांचे ऑनलाईन रक्कम ही आरोपी त्याच्या खात्यावर जमा केले. परंतु अनेक दिवस कोणत्याही प्रकारे आर्थिक मोबदलांना न मिळाल्याने आपले आर्थिक फसवणूक झाले आहे,असे लक्षात येतात त्यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क),66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सावंत करत आहे.